तालुक्यात सर्व जि.प.क्षेत्रात बूथ कमिटीची बैठक लावण्याच्या मा.आमदार राजेंद्र जैन यांच्या सूचना
सालेकसा : बाजीराव तरोने
आज सालेकसा येथे जिल्हा परिषद क्षेत्र झालिया, पिपरिया व सालेकसा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बूथ पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
क्षेत्रात प्रत्येक बुथवर क्रियाशील व सक्षम कार्यकर्त्यांची निवड करून श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आपण सर्वांना मिळून काम करायचे आहे. प्रत्येक बुथवर काम करेल अश्याच उत्साही व सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देऊन तालुक्यातील प्रत्येक बुथ निहाय्य सक्रिय व क्रियाशील प्रमुखाची निवड करण्यात यावी यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात तालुक्यातील सर्व जि.प.क्षेत्रात बैठक लावून बूथ कमिटीचा आढावा घेण्यात येईल. या बैठकीमध्ये खा.मा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या प्रयत्नाने व महायुती सरकारच्या माध्यमातून झालेल्या जनहितकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी असे संबोधन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.
यावेळी प्रामुख्याने सर्वश्री राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, प्रभाकर दोनोडे, सुरेश हर्षे, डॉ अजय उमाटे, बिसराम चर्ज़े, दौलत अग्रवाल, गीताताई चौधरी, चुन्नीलाल सहारे, राजाभाऊ डोंगरे, विनोद अग्रवाल, अशोक गोस्वामी, वंदना पंधरे, सिसटा टिमोर, पुष्पा राणे, आशा मानकर, प्रमिला राणे, छबीता राणे, फेकन राणे, छाया ठाकरे, सुनीता राऊत, राधिका उईके, रंभा वाढीवे, सुरेश अग्रवाल, नरेंद्र वशिष्ट, महेश भुते, सुभाष बहेकार, डॉ आर कटरे, सामू मेश्राम, योगेश असाटी, राधेश्याम गंगभोज, मुलचंद सय्यम, दिनेश लिल्हारे, नितेश चौधरी, गिरिधारी मानकर, रविकांत राऊत, हिरामण बडोले, ओमप्रकाश लांजेवार, संदीप मिश्रा, संतोष नागपुरे, मुकेश मेहरे, बारेलाल वरखडे, सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.