चिमूर येथील बालाजी सागर तलावात सापडले इसमाचे प्रेत. शवविछेदणाकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल

0
340
1

चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

दिनांक 20/10/2024 रोजी सकाळी 10:00 वाजता. पोलीस स्टेशन चिमुर येथे माहिती मिळाली की, बालाजी सागर तलाव मध्ये एका इसमाचे प्रेत तरंगत आहे या माहितीवरून सहायक पोलीस निरिक्षक मल्हारी ताळीकोटे, व पोलीस शिपाई पंडित घटनास्थळी पोहोचल स्थानिक इसम यांचे मदतीने प्रेत तलावाचे बाहेर काढले असना ते अतुल आनंदराव कुमरे वय 22 वर्ष रा. खेडी ता. सावली जि. चंद्रपूर यांचे आहे असे बालाजी हॉटेल चे मालक प्रमोद पिटुजी पिसे वय 42 वर्ष रा. नेताजी वार्ड चिमुर यांनी सांगीतले. त्यांचे रिपोर्ट वरून अकस्मात मृत्युची नोंद कलम 194 BNSS प्रमाने कण्यात आली आहे. सदरचे प्रकरणी घटनास्थळ पंचनामा व इन्कवेस्ट पंचनामा (प्रेताचा पंचनामा) करण्यात आला. प्रेत शवविच्छेदनाकारिता उपजिल्हा रुग्नालय चिमुर येथे आहे मृतकाचे नातेवाईक आल्या- वर PM करण्यात येईल. सदरचे प्रकरणाचा प्राथमिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे पोलीस शिपाई पंडित पोलिस निरीक्षक संतोष बाकल यान्चे मार्गदर्शनात करित आहे.