.कमलापूर २०/१०/२०२४
आज दिनांक २०ऑक्टोबर रोजी अहेरी येथे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त अहिरी तालुक्यातील कमलापूर व ताटीगुडम येथील युवकांनी मंत्री धर्मरावा बाबा आत्राम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व त्यांच्या झंजावत विकासाच्या कार्यावर प्रभावित होऊन युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट ) मध्ये अधिकृतपणे पक्षप्रवेश केला. विशेष म्हणजे हे सगळे युवक मंडळी नव मतदार असून अहेरी विधानसभा क्षेत्रात युवकांचा कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर विस्वास
ठेऊन पक्ष प्रवेश केला यावेळी धर्मराव बाबा आत्राम यांनी सगळ्या युवकांना आपण तुमच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. यावेळी सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम व युवा नेते रामेश्वरराव बाबा आत्राम सुद्धा उपस्थित होते.