पोलीस मुख्यालय भंडारा येथे पोलीस हुतात्मा स्मृती दिन साजरा

0
115
Oplus_0
  • प्रतिनिधी/पंकज रहांगडाले
  • भंडारा : कर्तव्य पथावर अग्रेसर होत असत्ता हौतात्म्य पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांची आठवण म्हणुन संपूर्ण देशात पोलीस प्रशासनाद्वारे २१ आक्टोबर हा पोलीस हुतात्मा स्मृतीदिवस म्हणुन पाळला जातो. त्यानिमित्ताने आज दि. २१ ऑक्टोबर पोलीस मुख्यालय, भंडारा येथील पोलीस हुतात्मा स्मारक स्मृतिस्तभ येथे स. ०८ वा. श्रध्दांजली व शोक सलामीचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधिक्षक नूरुल हसन यांच्या उपस्थितीत अपर पोलीस अनिकेत भारती, मनोज सिडाम उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी, नितीन चिचोळकर, प्रभारी पोलीस उपअधिक्षक (गृह) हे उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिक्षक पोलीस अधिक्षक नूरुल हसन यांनी आजचा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा दिवस आहे. यावर्षी देखील संपुर्ण भारतातून एकूण २६४ पोलीस अधिकाऱ्यांनी/कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावीत असतांना आपल्या मातृ‌भुमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यांना शक्तः वंदन असे बोलून शहीद पोलीसांच्या स्मृतिंना उजाळा दिला, तसेच २१ ऑक्टोबर १९५९ रोजी ल‌द्दाख हद्दीत भारत तिबेट सीमेवर १६ हजार फुट उंचावर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १० शिपाई गस्त घालत असताना हिंदी चिनी भाई भाई’ असा नारा लावणाऱ्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर अकस्मात हल्ला केला. याची चाहूल लागताच सीमेच्या रक्षणार्थ अपुरे मनुष्यबळ व अपुरे शस्त्रे असल्याची पर्वा न करता जवानांनी मातृभू‌मीसाठी प्राणपणाने लढून हौतात्म्य पत्करले. त्यांच्यावर पोलिस इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना घडली त्या हॉट्रस्प्रिंग येथे या वीरांचे स्मारक उभारले आहे. तेव्हापासुन हा दिवस पोलिस हुतात्मादिन / पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. तेथे संपूर्ण भरतातील पोलीसांनी या विराचे स्मारक उभारले आहेत. स्मारकावर शब्द अंकीत आहेत. ” when you go home tell them of us. For their tomorrow we gave up our todoy”
  • सदर प्रसंगी पोलीस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अनिकेत भारती, मनोज सिडाम उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी, नितीन चिचोंळकर, प्रभारी पोलीस उपअधिक्षक (गृह) १० यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहीली व अग्नीशस्त्राव्दारे ३० काडतूसांच्या फैरी झाडून शोक सलामी देण्यात आली. तसेच पोलीस बॅन्ड पथक यांनी राष्ट्रभक्तीपर गितांच्या धुन वाजवुन श्रध्दांजली अर्पण केली.” पोलीस हा समाजातील एकमेव घटक आहे. जो दिवस रात्र आपल्यासाठी सज्ज असतो. १५ ऑगस्ट १९४९ पासुन शहीद झालेल्या सर्व शुर पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे भावपुर्ण श्रध्दाजंली देण्यात आली. सदर प्रसंगी कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या शहीदांच्या नावाचे वाचन केले. तसेच भंडारा जिल्हयातील शहीद पोलीस अधिकारी/कर्मचारी पोउपनि दिपक सखराम रहिले, पोहवा. योगेश तुकाराम हेडाऊ, पोशी शिवलाल सिताराम बरैषा, पो.नि. दामोधर शंकर वडतकर, पोशी. रविकुमार सेवकराम जौंजाळ, पो. नि. ईशंत कुमार रामरतन भुरे, पोशी. भोजराज शंकर बांभरे, पो. नि. मुलचंद शामराव भोयर, पो. नि. मनोज शालीकराम गि-हेपुंजे, पो.हवा. विश्वनाथ यादवराव बोरकर, पो. नि. जयपाल शेळके, स. फौ. शराफा हुसैन पठाण, पो. हवा. सुनिल महादेव मेश्राम, यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हयातील शहिद अधिकारी व कर्मचारी यांचे कुटुंबीय सदर कार्यक्रमात उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला राखीव पोलीस निरीक्षक अरविंद दुबे, सर्व शाखेचे, पोलीस मुख्यालय येथील कवायत निर्देशक, कर्मचारी तसेच पोलीसांचे कुंटुबिय हजर होते.