गोंदिया : तिरोडा येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिरोडा ग्रामीण व शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होऊन काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “पक्षातील किंवा समविचारी लोकांमध्ये असलेल्या मतभेदांना बाजूला सारून आपापसातील दुरावा संपवावा, तेव्हाच संघटना मजबूत होईल. खा. प्रफुल पटेल यांच्या दूरदृष्टीकोनातून विकासाच्या निर्णयांना अंमलात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण निष्ठेने कार्य करण्यासाठी सज्ज व्हा.” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
या चर्चेत मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांमध्ये सर्वश्री मनोहर चंद्रिकापुरे, विजय रहांगडाले, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, कैलाश पटले, योगेंद्र भगत, मनोज डोंगरे, नीता रहांगडाले, बालू बावनथड़े, किरण पारधी, अजय गौर, राजेश गुनेरिया, अविनाश जायस्वाल, नरेश कुंभारे, जगदीश कटरे, राखी गुनेरिया, विजय बंसोड़, मनोहर तरारे, नागेश तरारे, भोजराज धामेचा, रामकुमार असाटी, जिब्राइल पठान, सलीम जवेरी, बबलू ठाकुर, प्रशांत डाहरे, विजय बिंझाड़े, जितेंद्र चौधरी, सविता पटले, ममता बैस, रीता पटले, जया धावड़े, रामसागर धावड़े, मनोहर राउत, जगत धुर्वे, मुकेश पटले, श्यामा शरणागत, भूपेंद्र पटले, मुन्ना बिंझाड़े, किरण बंसाडे, सुखदेव बिसेन, ब्रिजलाल ठाकरे, वाय टी कटरे, टेकलाल सोनवाने, संदीप मेश्राम, अलकेश मिश्रा इत्यादींचा समावेश होता.
मा. जैन यांच्या या चर्चेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, आगामी निवडणुकीत एकसंघ होऊन काम करण्यासाठी सर्वजण एकजूट होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

