गोंदिया : तालुका अंतर्गत नागरा जिल्हा परिषद क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बूथ कमिटीची बैठक पगरवार लॉन, चांदनीटोला येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी पक्ष संघटनेवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून श्री जैन यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना राजेंद्र जैन म्हणाले की, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी बूथ कमिटी तयार करणे आवश्यक आहे. गावातील पक्ष किंवा समविचारी लोकांशी असलेले हेवेदावे विसरून आपापसातील दुरावा नष्ट करा तरच संघटन मजबूत होईल. खा. प्रफुल पटेलजी यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना बोनस मिळाला यावर्षी सुध्दा हेक्टरी 25 हजार बोनसची शासनाकडे सकारात्मक चर्चा, तसेच दिवाळी पूर्वी आधारभूत शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे लवकरच धान खरेदी केंद्र सुरू होतील, ई पिक 7/12 ऑनलाईन ची प्रक्रिया सूरू झाली असून शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करावी. गोंदियाला मेडीकल कॉलेज अश्या अनेक विलक्षण दूरदृष्टीकोनातून होत असलेल्या विकास कामांना व विचारसरणीला जनतेसमोर ठेवून एका छताखाली या. याता निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण निष्ठेने कार्य करण्यासाठीं कार्यकर्त्यांनी कामाला लागा अश्या सूचना त्यांनी दिल्या.
त्यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, बाळकृष्ण पटले, कुंदनभाऊ कटारे, पूजा अखिलेश सेठ, गणेश बरडे, कीर्ती पटले, सरला चिखलोंडे, रवी पटले, रमेश गौतम, अखिलेश सेठ, बाबा पगरवाल, चंदन पटले, दीपक साठवणे, राजेश नागपुरे, भोजराज दमाहे, गंगाराम कापसे, कुंतेश्वर लांजेवार, राजेश रामटेके, प्रीयवंता मंडाले, विजय रहांगडले, विजय लिल्हारे, सुनील पटले, शैलेश वासनिक, रौनक ठाकूर, प्रतीक पारधी सहीत मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

