आर्ट्स कॉलेज सिहोरा येथील मंगला ढबाले या विद्यार्थिनीची आंतरविद्यापीठ कबड्डी संघात निवड

0
118
1

प्रतिनिधी/ मुकेश शुक्ला 

आर्टस् कॉलेज सिहोरा येथील बी.ए. व्दितीय वर्षाची विद्याथीर्नी कु. मंगला ढबाले हिची रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या कबड्डी संघात निवड झाली असून २२ ऑक्टोंबर ते २५ ऑक्टोबरला ला श्री. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे होण्या-या पश्चिम क्षेत्रीय आंतर विद्यापीठ संघात निवड झाली आहे. कु. मंगला ढबाले हि मागील २ वर्षा पासून महाविद्यालया कडून नागपूर विद्यापीठाच्या कबड्डी संघात प्रतिनिधित्व करीत आहे.तिच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचीन चाफलेे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. जयकुमार क्षिरसागर, तसेच संस्थचे अध्यक्ष दिलीपराव सोमनाथे, डॉ. मदन प्रधान, डॉ. मनोज सरोदे, डॉ. मंजूषा समर्थ, डॉ. चंद्रशेखर भेजे, डॉ. प्रेमा कुंभलकर, प्रा. रेणुका पटले, प्रा. राजेश अंबुले, प्रा. रविद्र पारधी, प्रा. कु. साक्षी मिश्रा, अविनाश हेडावू, कार्तीक टेभूर्णे, प्रकाश उके, मनसुरलाल मरस्कोल्हे, राजकुमार गभने, कु. शारदा वैरागडे, श्रीमती सोनाली कुंभलकर व खेळाडू विद्यार्थी या सर्वानी त्याचे कौतूक व अभिनंदन केले.