गोंदिया, दि.23 : शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2024-25 मधील धान खरेदीकरीता BEAM पोर्टलवर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत करावयाची आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. शेतकरी नोंदणी करतांना हंगाम 2024-25 पासून ज्या शेतकऱ्यांचा सातबारा उतारा आहे त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे, त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहून दिलेल्या कालावधीत म्हणजेच 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत खरेदी केंद्रावर मुदतीत धान विक्रीसाठी नोंदणी पूर्ण करावी.
शेतकऱ्यांनी आधारभुत धान खरेदी केंद्रावर खरीप पणन हंगाम 2024-25 मधील सातबारा उतारा, पीक पेरा असलेला, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे घेवून नजीकच्या केंद्रावर जावून विहीत मुदतीत नोंदणी करावी. बिगर आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांनीच मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.