



आज 96 अर्जांची उचल
गोंदिया, दि.23 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यात 23 ऑक्टोबर रोजी एकुण 96 अर्जांची उचल करण्यात आली. आज गोंदिया विधानसभा मतदारसंघातून पंकज सुंदरलाल यादव यांनी शिवसेना (उबाठा गट) पक्षातून 1 नामनिर्देशनपत्र दाखल केले व 1 नामनिर्देशनपत्र अपक्ष म्हणून दाखल केले.
63-अर्जुनी मोरगाव, 64- तिरोडा, 65-गोंदिया, 66-आमगाव या विधानसभा क्षेत्रामध्ये 22 ऑक्टोबर पासून अर्ज स्विकारण्यास सुरूवात झाली असून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र सादर करायचे आहे. 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आज 51 अर्जाची उचल करण्यात आली. 64-तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये आज 14 अर्जाची उचल करण्यात आली. 65-गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये आज 17 अर्जाची उचल करण्यात आली व 66-आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आज 14 अर्जाची उचल करण्यात आली.


