गडचिरोली /अमोल कोलपाकवार
मागील अनेक दिवसापासून अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीची सीट नेमकी कुणाला मिळेल याविषयी मोठा संभ्रम निर्माण झाला होता काँग्रेसने या विधानसभा क्षेत्रावर दावा ठोकल्याने महाविकास आघाडी समोर मोठा पेच निर्माण झाला होता. महाविकास आघाडी कडून इच्छुक असणारे जवळपास सर्वच इच्छुक उमेदवार मुंबईला ठाण मांडून बसले होते. परंतु महाविकास आघाडी कडून अहेरी विधानसभा क्षेत्रात भाग्यश्री आत्राम यांना अखेर तुतारी फुंकण्याची संधी मिळाली आहे.. अहेरी आलापल्ली परिसरात सदर बातमी माहीत होताच कार्यकर्त्यामध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. विशेष म्हणजे अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. परंतु कार्यकर्त्यांचा वाढलेला उत्साह पाहता भाग्यश्री आत्राम यांना ही सीट कन्फर्म झाल्याची चर्चा अहेरी विधानसभा क्षेत्रात पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे महायुतीकडून कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे सुद्धा पारडे जड आहे त्यामुळे अजय कंकडालवार यावेळेस नेमकी कोणती भूमिका घेतात आणि माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम आता नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी आमदार दीपक दादा आत्राम यांनी आधीच अपक्ष फार्म भरून मोकळे झाले आहेत. एकंदरीत अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या काळात चौरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.