आज 9 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल : 51 अर्जाची उचल

0
722

गोंदिया, दि. 24 ऑक्टोबर: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यात 24 ऑक्टोबर रोजी 9 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले, तसेच एकूण 51 अर्जाची उचल करण्यात आली आहे.

आज दाखल झालेल्या उमेदवारांची माहिती

गोंदिया जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांमधून आज काही उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केली. प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

1. गोंदिया विधानसभा मतदारसंघ:

➡️ ओमप्रकाश रहांगडाले (अपक्ष) यांनी नामांकनपत्र दाखल केले आहे.

➡️ विनोद अग्रवाल यांनी भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) तिकिटावर नामांकनपत्र दाखल केले.

2. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ:

➡️ ॲड. पोमेश सुखदेव रामटेके यांनी (अपक्ष) उमेदवारी दाखल केली.

➡️ बन्सोड दिलीप वामन यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

3. आमगाव विधानसभा मतदारसंघ:

➡️ सहषराम मारोती कोरोटे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून दोन नामांकनपत्र दाखल केले.

➡️ चाकाटे विलास पंढरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) कडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

➡️ संजय हनुवंतराव पुराम यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

4. तिरोडा विधानसभा मतदारसंघ:

➡️ रविकांत खुशाल बोपचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) कडून उमेदवारी दाखल केली.

➡️ विजय भरतलाल रहांगडाले यांनी भाजपच्या तिकिटावर उमेदवारी दाखल केली.

अर्जाची उचल

गोंदिया जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये आज एकूण 51 अर्जांची उचल करण्यात आली. त्याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

63-अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात: 21 अर्जांची उचल

64-तिरोडा विधानसभा क्षेत्रात: 11 अर्जांची उचल

65-गोंदिया विधानसभा क्षेत्रात: 3 अर्जांची उचल

66-आमगाव विधानसभा क्षेत्रात: 16 अर्जांची उचल

आजच्या अर्ज उचल प्रक्रियेमुळे निवडणुकीची रंगत वाढली असून, विविध पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

 

Previous articleअखेर भाग्यश्री आत्राम यांना मिळाली ‘तुतारी’…
Next articleगोंदियात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविरोधी मोठी कारवाई