आगामी दिवाळी सण व विधानसभा निवडणुक संदर्भात पोलीसांचा ऑलआऊट/कोंबिंग ऑपरेशन

0
122
Oplus_0

प्रतिनिधी/पंकज रहांगडाले 

भंडारा : जिल्ह्यात आगामी दिवाळी सण व विधानसभा सार्वत्रीक निवडणुक संदर्भात भंडारा पोलीस दलातर्फे ऑल आऊट कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांचे मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्यात ऑल आऊट, नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली. आगामी येणारे दिवाळी सण उत्सव शहरात व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरे होणार आहेत व विधानसभा सार्वत्रीक निवडणुकी दरम्यान व सदर उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता पूर्वीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. सर्वत्र शांतता राहावी व कोणतेही घातपाती कृत्य/ अप्रिय घटना घडू नये याकरिता जिल्ह्यात ऑल आऊट, कोंबींग ऑपरेशन व नाकाबंदी मोहीम यशस्वी राबविण्यात आली.

भंडारा जिल्हयातील ऑल आऊट, कॉम्बिंग ऑपरेशन/ नाकाबंदी दरम्यान 58 अधिकारी व 397 अंमलदार हजर होते. भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत Drunk And Drive – 6 कार्यवाही, जुगार- 4 कार्यवाही, दारूबंदी कायदा अन्वये 26 कार्यवाही, रेती चोरी – 3 कार्यवाही, कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये 1 कार्यवाही, मोटार वाहन कायदा अन्वये – 449 केसेस करण्यात आले.         

        कारागृहातुन सुटलेले गुन्हेगार, अभिलेखावरील गुन्हेगार, महितीगार गुन्हेगार एकूण 180 इसम यांना त्यांच्या घरी चेक करण्यात आले. तसेच नाकाबंदी दरम्यान 926 वाहने चेक करण्यात आले.