➡️एक दिवा सहयोगाचा
➡️”आपले योगदान, कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य आणणारे”!
➡️ सर्वांनी एकत्र येऊन करूया, सर्वांच्या दीपावलीला उजाळा!
आमगांव : २४ ऑक्टोबर २०२४ रोजी, मानवता मतिमंद शाळा, आमगाव येथे “उडान समूह” शाखा आमगावच्या वतीने दीपावली साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिवीर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून झाली. उपस्थितांनी प्रार्थना केली आणि मनात एक निःस्वार्थ भाव ठेवून कार्यक्रमाची पुढील रुपरेषा ठरवली.
दान हे समाजात समानतेची भावना निर्माण करणारे असते, असे मानले जाते. अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कठीण परिस्थितीत व्यक्तीचे धैर्य वाढवतात. दानाच्या माध्यमातून त्यागाची भावना वृद्धिंगत होते. या विचारधारेने प्रेरित होऊन, उडान समूह शाखा आमगावने दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर विद्यार्थ्यांना कपडे आणि मिठाई वाटप करून आनंद साजरा केला.
कार्यक्रमात के. एम. बागडे (शाखा व्यवस्थापक), श्रीमती ओमेश्वरी हरिनखेडे (उडान समूह TL आमगाव) , शाखेतील सर्व BDO, BDE आणि BO मानवता मतिमंद शाळेचे सर्व कर्मचारीगण उपस्थित होते.
सर्वांनी एकत्र येऊन आनंद वाटत, प्रेमाने परस्परांच्या सोबत हा कार्यक्रम साजरा केला. या दिवाळीला सर्वांनी एकत्र येऊन आनंद व प्रकाशाच्या रूपाने अधिक उजळविले.

