तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातून धनेंद्र तुरकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

0
152
1

तालुका प्रतिनिधी/ मुकेश शुक्ला

तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातून धनेंद्र तुरकर यांनी दि. 25 ऑक्टोबरला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. धनेंद्र तुरकर यांनी 1999 पासुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष संघटना वाढीसाठी अविरत कार्य केले. 2019 या काळात विधानसभा निवडणुकीत तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातून त्यांनी उमेदवारी मागितली होती परंतु पक्षश्रेष्ठींनी त्यांना 2024 मध्ये उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यावेळी पक्षश्रेष्ठींनी विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांना पुन्हा उमेदवार दिली. यावेळी नाराज झालेले धनेंद्र तुरकर यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाचा प्राथमिक सदस्याचा तसेच तुमसर तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत शेकडो कार्यकर्त्यां समक्ष अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात खिंडार पडले असल्याची चित्र दिसत आहे.