वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-गजानन पोटदुखे
दिनांक :-27 ऑकटोबर 2024
भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेश बकाने यांनी शुक्रवारी दुपारी भव्य मिरवणुकीसह तहसील कार्यालयात येऊन नामांकन अर्ज दाखल केले यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार रामदास तडस,माजी खासदार सुरेश वाघमारे, शिवसेना जिल्हा प्रमुख गणेशजी ईखार, गिते,यांची उपस्थिती होती.
देवळी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहयला लागले असून आज प्रथमताच भारतीय जनता पक्षाने शक्ती प्रदर्शन घडवून आणले, भोंग सभागृहामध्ये मतदार संघातील व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त् गोळा झाले होते. माजी खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी मार्गदर्शन करून काँग्रेस पक्षावर टीकेचा भडीमार केला. यावेळी माजी खासदार सुरेश वाघमारे, सुनील गफाट,संजय गाते, अतुलजी तराळे महिला आघाडी अध्यक्ष वैशालीताई येरावार, माजी. नगराध्यक्ष शोभाताई तडस, सुचिता ताई मडावी, मिलिंद भेंडे,नानाजी ढगे यांनी यावेळी मार्गदर्शन केले भोंग् सभागृहामध्ये दुपारी एक वाजता ढोल ताशाच्या तालावर बैलबंडी सजवून मोठ्या ताफ्यासह मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक गांधी चौक ठाकरे चौक साप्ताहिक बाजार चौक मार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष तथा नागरिकांची उपस्थिती होती.