आमगाव / देवरी विधानसभेच्या निवडणुकीकरीता महायुतीचे उमेदवार संजय पुराम दाखल करणार नामांकन अर्ज

0
343

आमगांव : आगामी आमगाव / देवरी विधानसभा निवडणुकीकरीता महायुती आणि भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय पुराम आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीकरीता ते तिसऱ्यांदा आपल्या विजयाचा संकल्प सिद्ध करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. 

संजय पुराम हे  उद्या २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ११ वाजता देवरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष, कार्यकर्ते आणि मतदारांना देवरी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 संजय पुराम यांच्या अर्ज दाखल करण्याच्या घोषणेनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संजय पुराम यांचा पूर्वीचा राजकीय अनुभव, त्यांची कार्यक्षमता आणि जनतेशी असलेले जवळचे नाते यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकजूट दिसून येत आहे.

संजय पुराम यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमगाव / देवरी विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय रंगत आणखी वाढणार आहे. त्यांच्या उमेदवारीने महायुतीसाठी एक मजबूत नेतृत्वाचे स्थान निर्माण केले असून, इतर पक्षांच्या उमेदवारांसाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

 

Previous articleएआयएसएफच्या राज्याध्यक्ष पदी कॉ. वैभव चोपकर तर राज्य सचिव पदी कॉ. प्रतीक्षा ढोके यांची नियुक्ती
Next articleवनरक्षक काहुडकर यांचा सपत्नीक सत्कार