वनरक्षक काहुडकर यांचा सपत्नीक सत्कार

0
1567

जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले 

तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बपेरा व सोंड्या येथे कार्यरत वनरक्षक ज्ञानेश्वर काहुडकर यांनी सपत्नीक पाच वर्षे सेवा केली. नुकतीच त्यांची बदली वर्धा येथे झाली. वनरक्षक ज्ञानेश्वर काहुडकर यांनी आपल्या सेवाकाळात सामाजिक कार्यात मोठे योगदान केले तर युगांधर सांस्कृतिक व क्रीडा मंडळातील विद्यार्थ्यांसाठी विशेष सहकार्य केले. या कार्याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ता गोपाल येडे यांनी वनरक्षक ज्ञानेश्वर काहुडकर यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देत सत्कार केला. यावेळी पत्रकार जितू पटले, प्रफुल्ल बघेले, वनविभागाचे कर्मचारी वाघाडे, पचारे प्रामुख्याने उपस्थित होते.