अहेरी विधानसभात १४ उमेदवार रींगणात….

0
220
1

*नामनिर्देशनपत्र छाननीत जिल्ह्यातील 65 पैकी 52 नामनिर्देशन अर्ज वैध*

*आरमोरीतून 12, गडचिरोलीतून 14 व अहेरीतून 14 उमेदवार रिंगणात*

• आरमोरीतून 2 तर आणि अहेरीतून 2 उमेदवार बाद

गडचिरोली दि. 30 (जिमाका): गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात आज नामनिर्देशनपत्रांची छाननी संबंधीत निवडणुक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली. यात कालपर्यंत दाखल करण्यात आलेल्या एकूण 65 नामनिर्देशन अर्जापैकी 52 अर्ज वैध ठरले तर 13 अर्ज अवैध ठरले.

67-आरमोरी विधानसभा निवडणुकीसाठी 14 उमेदवारांनी दाखल केलेल्या 20 अर्जापैकी 12 उमेदवारांचे 18 नामनिर्देशनपत्र वैध ठरले. दामोधर तुकराम पेंदाम व निलेश छगनलाल कोडापे यांचे नामनिर्देशन अवैध ठरले.

68-गडचिरोली विधानसभा निवडणुकीसाठी 14 उमेदवारांनी दाखल केलेल्या 22 अर्जापैकी 14 उमेदवारांचे 19 अर्ज वैध ठरले. 3 अर्ज अवैध ठरले मात्र त्यांचे एकापेक्षा अधिक दाखले केलेले अर्ज वैध ठरल्याने उमेदवारांची संख्या कमी झाली नाही.

69- अहेरी विधानसभा मतदार संघासाठी 16 उमेदवारांनी दाखल 23 अर्जापैकी 14 उमेदवारांचे 15 अर्ज वैध ठरले. आत्राम तनुश्री धर्मरावबाबा व पोरतेट ऋषी बोंदय्या या दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले.

एबी फॉर्म विहित नमुन्यात सादर न केल्याने तसेच नामनिर्देशन पत्रावर दहा सूचकांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले गेले.