गोरगाव तालुका कार्यलयात भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश

0
42

सिलेगाव गावातील प्रमुख भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; डॉ. खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वावर विश्वास

गोरगाव : तालुक्यातील सिलेगाव गावात भाजपाचे काही महत्त्वाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सहभागी झाले आहेत. या प्रवेशाचा कार्यक्रम आज दि. 3 नोव्हेंबर 2024 रोजी गोरगाव तालुका कार्यलयात पार पडला. यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवेशानंतर कार्यकर्त्यांनी डॉ. खुशाल बोपचे (माजी खासदार) यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून पक्षात सामील होण्याचा संकल्प केला.

ग्राम सिलेगाव येथील संजय ठाकरे, राकेश उके, आणि  ध्रुवराज राऊत या प्रमुख भाजप कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केल्याने तालुक्यात राजकीय वातावरणात मोठा बदल दिसून येतोय.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष मा. प्रकाश  बघेले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर, तालुका महासचिव  सोमेश्वर बघेले, तसेच युवा अध्यक्ष शिवा भाऊ ठाकरे आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रवेश कार्यक्रमाचा उद्देश राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेला व्यापक आधार देणे आणि स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढवणे हा होता. यावेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या विकासात्मक योजनांवर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा दिला आहे.