अहेरी /प्रतिनिधी
पोलीस प्रशासन नेहमी जनतेसाठी दिवस रात्र झटत असतात. त्या पोलीस प्रशासनातील कर्मचारी आपले घरदार सोडून दिवाळी एका कॅम्प मध्ये करतात हे जनतेच्या फक्त सेवेसाठी…..
आहेरी तालुक्यातील रेपणपल्ली व पोलीस स्टेशन येथे आपल्या कुटुंबंपासून दूर असणाऱ्या पोलीस जवानांना दीपावली व भाऊबीजेच्या औचित्य साधून संतोष ताटीकोंडावार ( सामाजिक कार्यकर्ता तथा जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र गडचिरोली जिल्हा अध्यक्ष) यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उप पोलीस स्टेशन रेपणपल्ली येथे श्री पवार साहेब (psi ) मेश्राम मॅडम (psi ) उपस्थित होते.व विविध विषयावर चर्चा. यावेळी वेळी सुदीप रंगुवार, प्रदीप नीलम,सुधाकर बंडावर, स्नेहदीप आत्राम, महेश, अक्षय मडावी, राजू नलगुंटा इतर अन्य उपस्थित होते.