खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत श्री गजानन रहांगडाले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

0
80

गोंदिया – आज खासदार  प्रफुल पटेल यांच्या कार्यालयात गोंदिया येथे माजी आमदार  राजेंद्र जैन यांच्या हस्ते कालीमाटी, ता. गोरेगाव येथील  गजानन रहांगडाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी  राजेंद्र जैन यांनी त्यांना सन्मानपूर्वक दुपट्टा अर्पण करून पक्षात स्वागत केले.

गजानन रहांगडाले यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे पक्षाच्या वाढीसाठी निश्चितच नवे बळ मिळणार आहे.

या कार्यक्रमाला केवल भाऊ बघेले, जगदीश बावनथडे, केतन तूरकर, सोमेश्वर रहांगडाले, बाबा बोपचे, प्रतीक पारधी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Previous articleलढत – उमेदवारांची अंतिम यादी जाहीर……
Next articleजगदिश (बालू) बावनथडे यांची तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती