जगदिश (बालू) बावनथडे यांची तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

0
121
1

गोंदिया – आज खासदार  प्रफुल पटेल यांच्या आदेशानुसार तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पदी जगदिश (बालू) बावनथडे यांची नियुक्ती करण्यात आली. गोंदिया येथील खासदार प्रफुल पटेल यांच्या कार्यालयात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते बावनथडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

राजेंद्र जैन यांनी नवनियुक्त तालुकाध्यक्षांना तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन बांधणी व पक्षाच्या मजबुतीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे तिरोडा तालुक्यात पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाला राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, केवल बघेले, केतन तुरकर, जगदीश बावनथडे, अखिलेश सेठ, नीता रहांगडाले, रामसागर धावडे, मुन्ना बिंझाडे, अजय बारापात्रे, टेकलाल सोनेवाने, देवेंद्र चौधरी, युवराज रहांगडाले, पिंटू भैया, वीरेंद्र इडपाते, प्रतीक पारधी तसेच अन्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.