क्षेत्राच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या- प्रफुल पटेल

0
238

गोंदिया/भंडारा : आज परमपूज्य परमात्मा एक भवन, मोहाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, आरपीआय महायुतीचे तुमसर विधानसभा क्षेत्रातील उमेदवार राजुभाऊ कारेमारे यांच्या प्रचारार्थ खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुती च्या मित्रपक्षांची संयुक्त सभा संपन्न झाली.

राज्याला प्रगती पथावर नेण्यासाठी महायुतीच्या सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. महिलांसाठी लाडली बहीण योजना, मुलींना उच्च मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत विज बिल, किसान सन्मान योजना या सारख्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे जीवन बदलण्याचे काम आमचे सरकार करीत आहे.

भंडारा व गोंदिया जिल्हयातील शेतकऱ्यांना उन्नतीसाठी व या क्षेत्राला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने जिल्हयात शेतीच्या सिंचन क्षमतेत वाढ, गोसे खुर्द, बावनथडी, करचखेडा, व अन्य अनेक मध्यम व लघु सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांना बोनस देणे यासारख्या अनेक विकास कामांना प्राधान्य देऊन व भविष्यात या क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी महायुतीचे उमेदवार राजुभाऊ कारेमारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा जेणे करुन आम्ही दोन्हीं मिळून विकास कामांना गती देण्याचे काम करू असे आवाहन खासदार प्रफुल पटेल यांनी केले

सर्वश्री सर्वश्री प्रफुल पटेल, परिणय फूके, संतोष जैन,राजू कारेमोरे, प्रदीप पडोळे, किशोर चौधरी, बाबूलाल बोन्द्रे, भगवान चांदेवार, शैलेश डेकाटे, ढबाले गुरुजी, सदाशिव ढेंगे, मुन्ना फुण्डे, नितिन सेलोकर, देवचंद ठाकरे, रितेश वासनिक, बंडु बनकर, मंगेश पारधी, अनिल सारवे, अंचल मेश्राम, दिनेश निमकर, ज्योतिष नंदनवार, महादेव पंचघरे, आनंद मलेवार, युवराज जमइवार, छायाताई डेकाटे, रंजीताताई कारेमोरे,अनिता नलगोपुलवार, बाबूजी ठवकर, रवि लांजेवार, पंकज बालपांडे, दिगम्बर सेलोकर, आनंद रोचवानी, श्रीधर हटवार, विजू पारधी, निशिकांत इलामे, रामराव कारेमोरे, सचिन गायधने, सुभाष गायधने, पवन चौहान, विश्वनाथ बांडेबूचे, रोहित बुराडे सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व मतदार उपस्थित होते.

Previous articleजिल्ह्यात 64 उमेदवार निवडणूक रिंगणात
Next articleगोरेगाव येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते महायुती उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन