गोरेगाव : येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या जवळ भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना व आर पी आय मित्र पक्ष तिरोडा विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार विजय रहांगडाले यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. एकीचे बळ हे सर्वात मोठे असते, महायुतीच्या सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कार्य करावे व येणाऱ्या 20 तारखेला महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून बहुमताने निवडून द्या असे आवाहन याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
उद्घाटन प्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, विजय रहांगडाले, प्रेमकुमार रहांगडाले, हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, पंकज रहांगडाले, योगेद्र भगत, ओम कटरे, केवलभाऊ बघेले, बालूभाऊ बावनथडे, संजय बारेवार, लक्ष्मण भगत, रेखलाल टेंभरे, सीताताई रहांगडाले, चित्रकला चौधरी, नलिनी सोनवाणे, सुप्रिया गणवीर, डॉ श्री प्रकाश रहांगडाले, रामभाऊ हरिणखेडे, महेंद्र चौधरी, अनिता तूरकर, ललिता पुंडे, अनिल मडावी, सुनील कापसे, घनेश्वर तिरेले, गुड्डू ठाकूर, कृष्णकुमार बिसेन, कमलेस बारेवार, कल्पनाताई शेवटे, उषाताई रामटेके, रंजुताई अगडे, श्रद्धाताई रहांगडाले, रामेश्वरी रहांगडाले, प्रतीक पारधी सहित मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.