युवा ग्रामीण चामोर्शी तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी गठित

0
47

प्रतिनिधि / प्रफुल कोटांगले

चामोर्शी तालुका पोर्टल (प्रिंट मिडीया तसेच इलेक्ट्रॉनीक मिडीया) पत्रकार संघटनेची आज दिनांक 03/ 11/2024 ला कार्यकारिणी गठीत करण्यात आली,चामोर्शी येथील स्वाभिमानी जनसंपर्क कार्यालयात कार्यकारिणी गठीत करण्यात आली, यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार विनोद खोबे होते.यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी विविध गावातील पत्रकार.चामोर्शी.मुरखळा, कुनघाडा.भोगनबोडी.तालुक्यातील पोर्टल प्रिंट व यू ट्युब (लॉईव्ह)चे सर्व तालुका प्रतिनिधी.मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी चामोर्शी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष पदी श्री धनराज वासेकर यांची निवड करण्यात आली, तर सचिव पदी पुंडलिक भांडेकर,तालुका उपाध्यक्ष पदी मारोती बारसागडे,सहसचिव प्रफुल कोटांगले,कोषाअध्यक्ष कालिदास बुरांडे,तर सदस्यपदी अरुण गव्हारे,सदस्य प्रकाश घोगरे,सदस्य उमेश गाजपल्लीवर, सदस्य.यांची निवड करण्यात आले असून तालुक्यातील सर्व पत्रकार व मिञपरीवार कडुन अभिनंदन करीत आहे.