महायुतीची उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ महायुती मेळावा
आमगाव :-कष्टकऱ्यांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी महायुती सरकारनी अनेक योजना राबविल्या. राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेले. विकासाचा हाच रथ पुढे नेण्यासाठी व आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महायुतीमधील भाजपचे उमेदवार संजय पुराम यांना साथ देण्याचे आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
आमगाव देवरी विधानसभा मतदार संघाचे महायुतीतील भाजपाचे संजय पुराम यांच्या निवडणूक प्रचारार्थ लक्ष्मणराव मानकर फार्मसी कॉलेज आमगाव या ठिकाणी महायुती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते सभेला संबोधित करीत होते. याप्रसंगी उमेदवार संजय पुराम,राष्ट्रवादीचे , राजेन्द्र जैन , माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, अध्यक्ष म्हणून माजी आमदार केशवराव मानकर,भेरसींग नागपुरे, जिल्हा अध्यक्ष ॲड येशुलाल उपराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिप सदस्य सुरेश हर्षे,टिकाराम मेंढे, शिवसेना शिंदे गटाचे,तालुका प्रमुख अनिल सोनकनेवरे,संगीता शिवनकर,अतुल चौव्हान,देशकर,माजी जिप अध्यक्ष विजय शिवनकर, राजेन्द्र पटले,पिंटु अग्रवाल,राजेश भक्तवर्ती, जियालाल पंधरे,प.स. सभापती राजेंद्र गौतम,रवी क्षीरसागर, उपसभापती नोहरलाल चौधरी, यांच्या सह महायुतीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात केशवराव मानकर म्हणाले स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची धडपड आहे. तर महायुती सरकारने सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी विविध विकासात्मक योजना राबवील्या लाडकी बहीण, किसान सन्मान,वयोश्री यासारख्या योजनातून महायुती सरकारने सर्वसामान्यांना बळ देण्याचे काम केले.
या क्षेत्राच्या विकासासाठी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांना मतरुपी आशीर्वाद देऊन त्यांना साथ देण्याचे आवाहन मानकर यांनी केले. यावेळी उपस्थित महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा संजय पुराम यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले. रोजगार व महायुतीतील कार्यकर्ते यांचे काम करण्यासाठी भर देणार,संजय पुराम आमगाव देवरी मतदार संघात उद्योगधंद्याची स्थापना करून त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे आणि अधिका अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणणे यावरच आपला सदैव भर राहिला आहे. यापुढेही या मतदार संघात धानावर प्रक्रिया उद्योग व तसेच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा काम करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी सांगितले.

