तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार ठाकचंद मुंगूसमारे यांना संभाजी ब्रिगेडचे जाहीर समर्थन

0
206

प्रतिनिधी/ सतीश पटले 

तुमसर :- मोहाडी तुमसर विधानसभा क्षेत्राचे शेतकरी,शेतमजूर, कामगार, भूमीहीन,सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब,शोषित पिडीत सर्व सामान्य जनतेच्या मनामनातील युवा, झुंजार, तडफदार उमेदवार ठाकचंद मुंगूसमारे यांनी पदाधिकारी, युवक कार्यकर्ते , व नागरिकांसह  तालुक्यातील धूटेरा येथिल महादेव देवस्थान येथून प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी जिल्हा संभाजी ब्रिगेड ने ठाकचंद मुंगूसमारे यांना जाहीर समर्थन असल्याचे जिल्हा अध्यक्ष श्याम कोसरे व जिल्हा कार्याध्यक्ष एडवोकेट राकेश शिंदेगणसुर यांनी प्रचार सभेत जाहीर केले. याप्रसंगी मुंगूसमारे यांचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.