महायुतीच्या प्रचारार्थ प्रफुल पटेल यांचे आश्वासन – धान शेतकऱ्यांना यंदाही २५ हजारांचा बोनस

0
113

भाऊबीजेच्या औचित्यावर ‘लाडकी बहीण’ योजनेचे केले कौतुक

सडक/अर्जुनी: शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला–भगिनी यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात एक प्रकाशमय दिशा दिली आहे. समाजातील सर्व घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून न्याय देण्याचे कार्य आमचा पक्ष करीत आहे. मागील वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २० हजार रुपयांचा बोनस दिला गेला, आणि यंदाही हेक्टरी २५ हजार बोनस मिळवून देण्याचे आश्वासन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी दिले.

आशीर्वाद लॉन, सडक/अर्जुनी येथे आज महायुतीचे उमेदवार श्री राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या मित्र पक्षाची संयुक्त सभा झाली. खासदार प्रफुल पटेल, आमदार परिणय फुके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या बैठकीत महायुतीच्या योजनांची माहिती देत पटेल यांनी शेतकऱ्यांसाठीच्या आगामी कार्याचा आढावा घेतला.

या कार्यक्रमास प्रफुल पटेल यांच्यासोबत राजकुमार बडोले, परिणय फुके, खोमेशभाऊ रहांगडाले, यशवंत गणवीर, शेषराव गिऱ्हेपुंजे, लक्ष्मीकांत धमगाये, जितेंद्र मौर्य, रचनाताई गहाणे, तेजराम मडावी, अविनाश काशिवार, हर्ष मोदी, विलास कापगते, रजनीताई गिऱ्हेपुंजे, छायाताई चौहान, वंदना डोगरवार, कविताताई रंगारी, निशाताई तोडासे, सुधाताई रहांगडाले, चंद्रकलाताई डोंगरवार, राजेश कठाने, संगीताताई खोब्रागडे, लायकराम भेंडारकर, अशोक लंजे, रमेश चुरे, शालिंदर कापगते, चेतन वडगाये, शिवाजी गहाणे, गजानन परशुरामकर, प्रभूदास लोहिया, देवचंद तरोणे, तुकाराम राणे, शिशिर येडे, हितेश डोंगरे, गोरेश बावनकर यांच्यासह महायुतीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाऊबीज आणि ‘लाडकी बहीण’ योजनेचा गौरव

भाऊबीजेच्या औचित्यावर खासदार प्रफुल पटेल यांच्या बहिणींनी त्यांचे औक्षण करत आशीर्वाद घेतला. यावेळी महायुती सरकारने महिलांच्या सन्मानासाठी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. “माझ्या बहिणींना सन्मान व बळ देणारी ही योजना पुढेही सुरू राहील,” असे आश्वासन प्रफुल पटेल यांनी दिले.