आत्मनिर्भर व स्वावलंबना साठी महायुतीला साथ द्या – खा. प्रफुल पटेल

0
140

लाखनी : आज संताजी मंगल कार्यालय, लाखनी येथे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आर पी आय प्रणित महायुतीचे उमेदवार  अविनाश ब्राम्हणकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ खा.प्रफुल पटेल व आ. परिणय फुके, मा.खा.सुनील मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत मित्रपक्षाची संयुक्त सभा पार पडली.

महायुती सरकारचे जनतेचे कल्याण करणे हे एकमेव लक्ष आहे. आम्ही जनेतेच्या कल्याणासाठी व विकासासाठी महायुतीत सहभागी झालो. मागील अडीच वर्षात या सरकारच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, माता – भगिनी, जेष्ठ नागरिक, युवक यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कामे केली आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करतांना आपल्या भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी नेरला व पागोरा उपसा सिंचनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे दुःख दुर करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना या वर्षी 25000 हजार रूपये बोनस मिळवुन देणार याची ग्वाही देतो. युवकांच्या रोजगारासाठी, शेतकऱ्यांना लाभ, जेष्ठ नागरिक, माता – भगिनींचे आत्मनिर्भर व आर्थिक बळ मिळवुन देण्यासाठी महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन सभेला संबोधित करताना खा. प्रफुल पटेल यांनी केले.

सभेला सर्वश्री प्रफुल पटेल, परिणय फुके, सुनील मेंढे, अविनाश ब्राह्मणकर, नानाभाऊ पंचबुद्धे, धनंजय दलाल, प्रकाश बालबुद्धे, सुनील फुंडे, शिवराम गिऱ्हेपुंजे, शामजी झिंगरे, यशवंत सोनकुसरे, धनश्याम खेडिकर, धनू व्यास, श्रावण कापगते, सुदाम शहारे, घनश्याम मते, देवाजी पडोळे, संदिप भांडारकर, राजेश बांते, विनायक बुरडे, गणेश निरगुडे, खोमेश बोपचे, हेमंत ब्राह्मणकर, तु. रा. भुसारी, रेखा भाजीपाले, इद्रिस लध्दानी, नेपाल रंगारी, गिरीष बावनकुडे, भोजराम कापगते, शुभाष आकरे, मंगेश मेश्राम, नागेश वाघाये सहित मोठया संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.