0
45

जिल्हा प्रतिनिधी 

तुमसर:शेतकरी, शेतमजूर, दलित, शोषित पिडीत,महिला पुरुष आणि सर्वसामान्य माणसाच्या समस्यांची जाण असलेले राजु कारेमोरे यांच्या रूपाने तुमसर मतदारसंघाला एक खंबीर नेतृत्व लाभले आहे. आपल्या कल्पकतेने व धडाडीने त्यांनी तुमसर-मोहाडी मतदारसंघाचा शिक्षण, आरोग्य,शेती, औद्योगिक विकासाचा अनुशेष भरून काढत प्रगतीचे नवे मार्ग येथील जनतेला दाखवले. आमदार राजु कारेमोरे यांच्या कार्यकाळातील कामगिरी ही या पुर्वीच्या आमदारापेक्षा निश्चितच भारी असून त्याची परतफेड मतदानाच्या रूपातून या मतदारसंघातील जनता निश्चितच करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकनकर यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवला.ग्रामीण भागात रस्त्याची सुविधा नसल्याने शेतकरी व गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असे विजेच्या लपंडावामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होत असे याशिवाय आरोग्य ,शिक्षण,शेती,सुविधा वेळेवर न मिळाल्याने ग्रामीण भागातील अबाल वृद्धांना वेळप्रसंगी त्रास सहन करावा लागत असे. ही विदारक परिस्थिती या मतदारसंघाने अनेक वर्ष अनुभवली. मात्र राजू कारेमोरे यांनी आमदार झाल्यानंतर आपल्या विकासकार्यातून मतदारसंघाचे रुप पालटण्याचे कार्य हाती घेतले. याचा परिणाम म्हणून ग्रामीण व शहरी भागातील जनता पुन्हा राजु कारेमोरे यांना विजयी करेल असा दृढ विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकनकर यांनी व्यक्त केले.तुमसर येथे आयोजित ७ नोव्हेंबर रोजी प्रचार भेट दौऱ्या दरम्यान येथिल नागरिकांशी संवाद साधताना चाकनकर बोलत होत्या .तत्पूर्वी रुपाली चाकनकर या़चे येथिल उपस्थित शेकडो महीला- पुरुष कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.त्यावेळी भाजपा- शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस- पीरिपा महायुतीमधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शरद पवारांबद्दल वक्तव्य खपवून घेणार नाही

काही वैचारिक विषय आहेत किंवा वैचारिक मांडणी प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. त्यामुळं आम्ही आदरणीय अजित दादांसोबत आलोत. पण, आदरणीय शरद पवार साहेब हे आमच्या सगळ्यांचे दैवत आहेत. आमचेचं नाही तर महाराष्ट्र आणि देशाचे ते नेतृत्व आहेत. त्यामुळं अशा पद्धतीचं कोणी वक्तव्य करू नये. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो. अशा पद्धतीचे विधान जर कोणी आदरणीय पवार साहेबांबद्दल करीत असेल तर, इथून ती आम्ही पुढे खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सदाभाऊ खोत यांना दिला आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगाबाबत टीका केली होती. त्यावर रूपाली चाकणकर तुमसर येथे माध्यमा प्रतिनिधीशी .बोलत होत्या

 

 

 

.