महायुतीच्या प्रचार सभेत मान्यवर नेत्यांची उपस्थिती, शेतकऱ्यांना विकासाचे आश्वासन
आमगांव : आमगांव–देवरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या समर्थकांनी एकत्र येत मोठा शक्तीप्रदर्शन केले. कृषी उत्पन्न बाजार समिती, आमगांवच्या आवारात संपन्न झालेल्या या सभेला हजारो नागरिकांनी हजेरी लावली.
नितीन गडकरी यांनी मागील 10 वर्षांत महायुती सरकारच्या नेतृत्वात केलेल्या विकास कामांवर प्रकाश टाकला. त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी पूरक उद्योगांचे महत्त्व सांगितले आणि धानाच्या तनसीपासून हवाई इंधन तयार करण्याचे नवे तंत्रज्ञान सादर करण्याचे आश्वासन दिले. तसेच, भविष्यात गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील कुटुंबांना सीएनजीद्वारे स्वस्त दरात गॅस पुरविण्याच्या योजनेवरही चर्चा करण्यात आली.
गडकरी यांनी शेतकऱ्यांसह समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी महायुती सरकारने घेतलेल्या पुढाकारांचे वर्णन केले आणि जनतेला महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.
प्रफुल पटेल यांची ग्वाही – संविधानात कोणताही बदल नाही
महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि आरपीआयच्या एकत्रित युतीमुळे महायुतीच्या शक्तीत मोठी वाढ झाल्याचे सांगितले. विरोधक संविधान बदलणार असल्याचे अपप्रचार करत असल्याचे सांगत, त्यांनी संविधान बदलणार नाही याची ग्वाही दिली. त्यांनी फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर कार्यरत असल्याचेही सांगितले.
पटेल यांनी लाडली बहिण योजना, शेतकऱ्यांना बोनस, वीज बिल माफी, आणि किसान सन्मान योजना यांसारख्या योजनांमुळे शेतकरी, कष्टकरी आणि महिलांना महायुती सरकारने दिलेल्या सन्मानाची चर्चा केली.
सभेला महायुतीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते. यामध्ये परिणय फुके, संजय पुराम, राजकुमार कऱ्हाडे, अनिल सोले, अशोक नेते, केशव मानकर, भेरसिंग नागपुरे, यशुलाल उपराडे, नरेश महेश्वरी, विजय शिवणकर, प्रभाकर दोनोडे, बाळा अंजनकर, सुरेंद्र नायडू, सुरेश हर्षे, रमेश तराम, राजेंद्र गौतम, हनुवंत वट्टी, कमलबापू बहेकार, सी के बिसेन, जियलाल पधरे, चुंन्नीलाल शहारे, कविता रहांगडाले, अजय उमाटे, राजेश भक्तवर्ती, सुनिल ब्राह्मणकर, विकास महारवाडे, राजु पटले, सुनंदा उके, शिला ब्राह्मणकर, सीमा शेंडे, अंजली बिसेन, रवि शिरसागर, स्वप्नील कावळे, तुंडीलाल कटरे, सुभाष यावलकर, लोकनाथ हरिणखेडे, टीकाराम मेंढे, विनोद कन्नमवार, सुजित अग्रवाल, पंकज शहारे, दिलीप दृगकर, नोहर लाल चौधरी, दिनेश गोडसेलवार यांचा समावेश होता.
या सभेने महायुतीच्या समर्थकांचा जोश वाढवला आणि येत्या निवडणुकीत आमगांव-देवरी मतदारसंघात महायुतीच्या विजयी अभियानाला बळकटी मिळाली.