गोंदिया विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांचा प्रचार; खासदार प्रफुल पटेल यांनी दिला जनतेच्या प्रश्नांवर भर

0
159
1

गोंदिया : ग्राम बनाथर येथे महायुतीच्या उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या प्रचारार्थ भव्य सभा आयोजित करण्यात आली. या सभेला गोंदिया विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबतच खासदार प्रफुल पटेल यांनीही हजेरी लावली. या प्रसंगी प्रफुल पटेल यांनी जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले.

सभेत बोलताना पटेल म्हणाले की, “या क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम केले आहे. जनतेच्या आरोग्याच्या समस्यांना लक्षात घेऊन गोंदिया येथे मेडिकल कॉलेज सुरू झाले आहे आणि बिरसी येथून विमानसेवा सुरू केल्यामुळे शैक्षणिक, व्यापारी आणि शेतकरी वर्गाला लाभ होणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याचे, तसेच शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक कार्ये केली आहेत.”

अध्यक्षीय भाषणात, पटेल यांनी विधानसभा क्षेत्रातील विकास कार्याची शृंखला अखंडित ठेवण्यासाठी आणि अधिकाधिक प्रगती साधण्यासाठी महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. त्यांच्या सोबत विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेत उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्ते: प्रफुल पटेल, राजेंद्र जैन, कुंदन कटारे, पूजाताई अखिलेश सेठ, नेहा केतन तुरकर, कीर्ती पवन पटले, सरला लिकेस चिकलोंडे, केतन तूरकर, क्रांतिकुमार चौहान, अशोक तिवारी, शिवलाल जामरे, छगन माने, प्रवेश अवस्थी, रामनाथ बरापात्रे, सचिन बैस, रानु अवस्थी, रेखलाल राउत, सतीश बीसेन, इंदलसिंग राठौड़, रणजीत बीसेन, रमेश नागफासे, राजेश जामरे, विट्ठल पारधी, मदन बीसेन, मेहतर तेलसे, माधुरी रामटेके, जितलाल पाचे, संदीप तुरकर, धर्मू मानकर, चमरु बोपचे, संतोस वहाने, ओमप्रकास ठाकरे, लच्छु पाचे, दुर्गेश पाचे, रामलाल उईके, सतोस उईके, गणेश उईके, छोटू जमरे, गंगाराम मानकर, तेजराम सहारे, केसव नागफासे, संजय तुरकर, विशाल बागड़े, निकुंज तिवारी, सतीश जामरे, सुरपत खैरवार, हनस ठाकरे, फिरथ देवाधारी, सुखदेवप्रासाद गुप्ता, शैलेश वासनिक, सुनील पटले व इतर महायुतीचे पदाधिकारी.

या सभेच्या माध्यमातून गोंदिया विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या उमेदवारांना जनतेचा पाठिंबा मिळावा यासाठी जनतेशी संवाद साधण्यात आला.