अहेरी विधानसभा क्षेत्रात नव्या नेतृत्वाला संधी मिळणार का..?

0
56

अहेरी विधानसभा क्षेत्राकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून या विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार धर्मराव बाबा आत्राम तसेच अपक्ष उमेदवार अमरीशराव आत्राम व महाविकास आघाडीच्या उमेदवार भाग्यश्रीताई आत्राम या प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रत्यक्ष गाव खेड्यात जाऊन लोकांशी संपर्क साधत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अपक्ष उमेदवार अमरीशराव आत्राम, अपक्ष उमेदवार हनुमंतु मडावी, दीपक दादा आत्राम, मनसे चे संदीप कोरेत यांचा सुद्धा जोरात प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार भाग्यश्री आत्राम ह्या सुद्धा लहान थोर,महिला भगिनींमध्ये अतिशय लोकप्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. एकंदरीत या विधानसभा क्षेत्रात परिवर्तनाची नांदी सुद्धा पाहायला मिळत आहे. रस्त्यांचा झालेला सत्यानास याचा फटका प्रस्थापितांना बसणार की काय असे चित्र सध्या आहे. त्याचा फायदा भाग्यश्रीताई आत्राम यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे निवडणूक लढणाऱ्या सर्वच आजी, माजी आमदार, मंत्र्यांची कारकीर्द लोकांनी पाहिलीच आहे त्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात नव्या नेतृत्वाला संधी या वेळेस मिळणार अशी सुद्धा चर्चा रंगू लागले आहेत. 20 नोव्हेंबरला मतदानात कोण बाजी मारतो आता हे पाहणे बाकी आहे.