गोंदिया शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या – माजी आमदार राजेंद्र जैन

0
49

गोंदिया ;  विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार  विनोद अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोंदिया शहरातील दुर्गा चौक येथे माजी आमदार  राजेंद्र जैन व उमेदवार  विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली.

महायुती सरकारने लाडली बहीण योजनेचे १५०० वाढवून २१०० रुपये देण्याचे निश्चित केले आहे. महिला, युवक, जेष्ठ नागरिक यांच्या उन्नती साठी अनेक योजना अंमलात आणण्याचे काम सरकारने केले आहे या योजना निरंतर चालू ठेवण्यासाठी, खा.प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने मेडिकल कॉलेज, बिरसी वरून नियमित विमान सेवा, अनेक द्रुतगती रेल्वे गाड्यांचा थांबा यासह गोंदिया शहरातील पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे काम केले आहे. भविष्यात गोंदिया शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी महायुतीच्या उमेदवार यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन माजी आमदार  राजेंद्र जैन यांनी केले.

सर्वश्री राजेन्द्र जैन, विनोद अग्रवाल, दिनेश दादरिवाल, हुकुमचंद अग्रवाल, नानू मुदलियार, शिव शर्मा, सुनील केलणका, माधुरी नासरे, अशोक इंगले, दिनेश अग्रवाल, कशिश जैसवाल, नागेन्द्रनाथ चौबे, सविता इसरका, लवली होरा, श्वेता महेंद्र पुरोहित, संजय जैन, संजीव कुलकर्णी, बेबी अग्रवाल, अभिशेक पुरोहित, अनुज जैसवाल, आशा पाटिल, रुचिता चौहान, पूजा तिवारी, अमोल बेलगे, गुड्डू सोनी, संकल्प जैन, आर्यन जैन, राजू ठाकुर, राजेश दवे, अशोक बेलगे, विशाल ठाकुर, मनीष पोपट, विक्की यादव, तरंग वाडेकर, नागों बंसोड़, रौनक ठाकूर, कनक दोनोडे, शरभ मिश्रा सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Previous articleअहेरी विधानसभा क्षेत्रात नव्या नेतृत्वाला संधी मिळणार का..?
Next articleजिल्ह्यात आधारभूत किमतीत धान खरेदी सुरु – खा. प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याचे फलित