मोरगाव अर्जुनी येथे महायुतीची भव्य सभा – जिल्ह्यातील सर्वसमावेशक विकासाचे आश्वासन
गोंदिया जिल्हा, नवेगावबांध : मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मित्र पक्षांचे प्रतिनिधी, नेते, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत खा. प्रफुल पटेल यांनी मुख्य भाषण केले, ज्यामध्ये त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देत आगामी विकास कार्यक्रमांची माहिती दिली.
खा. प्रफुल पटेल यांनी सांगितले की, “महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आमच्या सरकारने ‘माझी लाडकी बहिण’ योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे महिलांना शिक्षण आणि आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे. शिवाय, शेतकऱ्यांसाठीही विविध उपक्रम राबवले जात आहेत, जसे की कृषी विजेचे बिल माफी, धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस, व धान खरेदी केंद्रांची स्थापना.”
महायुतीच्या विकास कार्यक्रमांमध्ये महिला, शेतकरी, आणि युवक यांच्यासाठी विशेष योजनांचा समावेश असून, महिलांना वर्षात तीन सिलेंडर मोफत, शेतकऱ्यांना हेक्टरी २०,००० रुपयांचा बोनस, आणि युवांना रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सर्व योजना जिल्ह्यातील नागरिकांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा घडवून आणतील, असे पटेल यांनी सांगितले.
नवेगाव बांध परिसराचा विकास व पर्यटन क्षेत्रासाठी विशेष योजना
खा. पटेल यांनी नवेगाव बांध परिसराचा उल्लेख करत या निसर्गरम्य स्थळाच्या विकासाच्या दृष्टीने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. “या भागात विविध प्रजातींचे पक्षी पाहायला येणारे पर्यटक मोठ्या संख्येने असतात. योग्य पायाभूत सुविधा निर्माण करून या पर्यटन स्थळाला चालना देण्यात येईल,” असे पटेल म्हणाले.
सभेच्या शेवटी, राजकुमार बडोले यांनी आपल्या भाषणात मतदारांचे आभार मानले आणि मत्स्य व्यवसाय, शेती, व इतर आर्थिक उपक्रमांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
या सभेला खा. प्रफुल पटेल यांच्यासह, सुनील मेंढे, राजकुमार बडोले, यशवंत गणवीर, शेषराव गिरीपुंजे, किशोर तरोने, लोकपाल गहाणे, नामदेव डोंगरवार, चामेश्वर गहाणे, विजयाताई कापगते, नारायण डोंगरवार, रचना गहाणे, हर्ष मोदी, केवळराम पुस्तोडे, विजय रामटेके, एकनाथ बारसागडे, प्रदीप मस्के, विजय कापगते, दयाराम लंजे, अनिषा पठाण, सुनिता जयस्वाल, भोजराम रहिले, रतीराम राणे, सुशीला हलमारे, आम्रपाली डोंगरवार, किशोर ब्राह्मणकर, चेतना कांबळे, निप्पल बरया, उद्धव मेहंदळे, रमण डोंगरवार, पिंटू निपाणी, गजानन डोंगरवार, जयंत लांजेवार, अण्णाजी डोंगरवार, नाजूक कुंभरे, राजू लाडे, प्रभू तागडे, सुनील भालाधरे, राजेश कठाणे, हर्षा राऊत यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
सभा यशस्वीरीत्या पार पडली असून, परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये महायुतीला भक्कम साथ देण्याचा उत्साह दिसून आला.

