महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचारासाठी सभा
गोंदिया : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, माजी आमदार गोपालदास अग्रवाल तसेच महाविकास आघाडीतील सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी गोंदियात मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजता सर्कस मैदानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप बन्सोड, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, गोंदिया जिल्हा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष पंकज यादव, गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष सौरभ रोकडे, गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वंदनताई काळे, गोंदिया जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबा बागडे, एनएसयूआय गोंदिया जिल्हाध्यक्ष अमन तिगाला, गोंदिया तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमेश अंबुले, गोंदिया शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष योगेश (बापू) अग्रवाल, गोंदिया तालुका महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनिताताई मुनेश्वर तसेच महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सभेला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
महाविकास आघाडीच्या या सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि अन्य घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.

