देवरी येथे आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचार सभा

0
466

आमगांव : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ११ नोव्हेंबर रोजी आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ देवरी येथे जाहीर सभा घेणार आहेत.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सभा दुपारी १ वाजता देवरी येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणार आहे. या सभेत ते महायुतीच्या वतीने मतदारांशी संवाद साधून प्रचार करणार आहेत. महायुतीने या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.