लाडशाखीय वाणी समाज मंडळ, कल्याणतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा

0
37

उज्ज्वल यशाच्या पताकाधारक विद्यार्थ्यांचा सन्मान

कल्याण : लाडशाखीय वाणी समाज मंडळ, कल्याणतर्फे दरवर्षीप्रमाणे समाजातील गुणी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या वर्षी देखील विविध शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा १० नोव्हेंबर २०२४ रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, शंकरराव चौक, बाजार पेठ रोड, कल्याण येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ. स्नेहल संदीप देव, प्रसिद्ध उद्योजिका आणि नमस्ते नाशिक फाऊंडेशन, नाशिकच्या अध्यक्षा, यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना तीन स्क्रीनपासून दूर राहण्याचे – मोबाईल, मॉनिटर, आणि टीव्हीपासून – मार्गदर्शन दिले, ज्याचा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष, स्त्रीरोग तज्ञ डॉ. विनोद मुरलीधर कोतकर (आई हॉस्पिटल, चाळीसगावचे संस्थापक अध्यक्ष: आई फाऊंडेशन) यांनी देखील उपस्थितांना आणि विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे महत्त्व सांगितले व त्यांना आपल्या शिक्षणात सतत प्रगती साधण्याचे आवाहन केले.

प्रमुख पाहुणे म्हणून  नरेंद्र बाबुराव पवार, माजी आमदार (१३८ कल्याण पश्चिम विधानसभा) उपस्थित होते. लाडशाखीय वाणी समाज मंडळ, कल्याणचे अध्यक्ष  सी. डी. येवले, उपाध्यक्ष , राजेंद्र एन. पाखले, सचिव बी. पी. नावरकर, उपाध्यक्ष  उमाकांत एन. कुडे, खजिनदार  रामकृष्ण एन. मराठे, तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य हजर होते.

या कार्यक्रमाद्वारे समाजातील पुढील पिढीला प्रोत्साहन देण्यात आले आणि त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबासमवेत समाजालाही दिले.