मंडई उत्सव थाटात साजरा
सालेकसा / बाजीराव तरोने
सालेकसा तालुक्याअंतर्गत येत असलेल्या नगरपंचायत क्षेत्रातील हलबिटोला येथे दशकांपासून सुरू करण्यात आलेली मंडई ची परंपरा ही येथील नागरिकांनी संस्कृति व परंपरा कायम ठेवून दरवरषीप्रमाणे या वर्षी ही मंडई उत्सव साजरा केला. या मंडई उत्सवाचे औचित्य साधून रात्री तीन अंकी नाटय संगीत जळते काळीज मातृत्वाचे या नाट्य संगीताचा निःशुल्क प्रयोग करण्यात आला. या आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक राजेंद्र बडोले व कार्यक्रमाची अध्यक्षता शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेन्द्र नायडू यांनी केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श.प जिल्हा महासचिव तिरथ येटरे, जि.प.सदस्य विमल कटरे, माजी जि.प.सदस्य दुर्गा तिराले,माजी नगराध्यक्ष विरेंद्र उईके, माजी बांधकाम सभापती न.प उमेदलाल जैतवार, भाजप तालुका उपाध्यक्ष विक्की भाटीया, मनसे तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस, शिवसेना तालुका प्रमुख विजय नागपुरे, ओबीसी कृती समिती जिल्हा अध्यक्ष बबलू कटरे, माजी जि.प.सदस्य रामेश्वर पंधरे माजी सरपंच गोविंदराम वरकडे, ,निकेश गावड, मूर्ती टेकाम, तालुका युवासेना प्रमुख मायकल मेश्राम, सुशील असाटी, पोलिस पाटील राजेंद्र बागडे,शालिनी बडोले, लता फुंडे शिवसेना पक्षप्रमुख आमगाव अनिल सोनकनवरे, राष्ट्रवादी काँग्रेस श प. जिल्हा उपाध्यक्ष बालू वंजारी , योगराज पटले, विजय फुंडे, गोपाल तिराले, इंद्रपाल कटरे, राजु लाडसे, मुनेश पंचेश्वर , मुकेश इनवाते आदी पाहुण्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज भेंडारकर व प्रास्ताविक बाजीराव तरोने यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय बजरंग नाट्य कला मंडळ हलाबिटोला येथिल सर्व सदस्यांनी व गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.