तुमसर: राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी महायुती सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. माता-भगिनींसाठी लाडली बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी बोनस, आयुष्यमान भारत, किसान सन्मान योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवन बदलण्याचे कार्य सरकार करत आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या शेतीला सिंचनासाठी आणि क्षेत्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी गोसे खुर्द, बावनथडी, करचखेडा यांसारख्या सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना २५,००० रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.
“या क्षेत्राचा विकास आणि येथील शेतकऱ्यांचा उन्नतीसाठी महायुतीचे उमेदवार राजूभाऊ कारेमोरे यांना विजयी करा, जेणेकरून विकासाच्या कामांना अधिक गती मिळेल,” असे आवाहन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
आज ग्राम सिहोरा (ता. तुमसर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, आर.पी. आय महायुतीचे उमेदवार राजूभाऊ कारेमोरे यांच्या प्रचारार्थ खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुती मित्रपक्षांची संयुक्त सभा पार पडली.
सभेत खासदार प्रफुल पटेल यांच्यासोबत नानाभाऊ पंचबुद्धे, प्रदीप पडोळे, यशवंत ढबाले गुरुजी, देवचंद ठाकरे, विट्ठल कहालकर, बंडुभाऊ बनकर, मयूरध्वज गौतम, नरेश ईश्वरकर, काशीराम टेंभरे, सुभाष बोरकर, देवानंद लंजे, सरिता मदनकर, दीपमाला भवसागर, आम्रपाली पटले, सलाम शेख, छगन पारधी, मार्कण्ड राणे, उमेश तुरकर, श्रीराम ठाकरे, बाला तुरकर, राजेंद्र ढबाले, गोवर्धन शेन्डे, सुखश्याम ऐड़े, दिलीप ढबाले, राहुल भवसागर, चंद्रशेखर चौरावार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीच्या या संयुक्त सभेला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, ज्यामुळे उमेदवार राजूभाऊ कारेमोरे यांच्या निवडणूक प्रचाराला मोठा आधार मिळाला आहे.