दोषींवर कठोर कारवाईची मागणी.
चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
राजुरा 11 नोव्हेंबर शहरापासून सात किलोमिटर अंतरावर आसिफाबाद महामार्गावरील तुलाना येथिल किसान जिनिगमध्ये काम करणाऱ्या मजुरांचे दोन चिमुकले निशा कुमारी समारुराम उईके (वय २) (मु. छतीसगढ)
प्रेम ज्ञानेश्वर कस्टकार (वय ८) (मु. इंदिरा नगर) खेळत असताना कापूस जमा करणाऱ्या मशीनने चिरडल्याची घटना (दि. ११) रोज सोमवारला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली आहे.
राजुरा असिफाबाद महामार्गावर तुलाना गावाजवळ असलेल्या किसान जिनिंग येथे मजुरी करणाऱ्या मजुरांचे दोन मुले वडीलांसोबत जिनिंगाच्या आत खेळत होते. याच वेळेला जिनिंगमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कापूस एकत्र करण्यासाठी मशीन सुरू होती. मशीन चालकाला मुल खेळत असल्याचे लक्षात न आल्याने खेळत असलेल्या दोन्ही चिमुरड्यांना चिरडून टाकण्यात आले. यावेळेस निशा कुमारी ही मुलगी जागेवर मृत पावली तर प्रेम याला उपचाराकरता उप जिल्हा रुग्णालय राजुरा येथे आणण्यात आले होते रुग्णालयात प्रेम याला डॉक्टरांनी मृत म्हणून घोषित केले. यावेळेस मृतकाच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त करत जिनिंग संचालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दवाखान्यात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून राजुरा पोलीस घटनास्थळी पोहोचून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. घटनेचा समोरील तपास राजुरा पोलीस करीत आहे.