आलापल्ली /अमोल कोलपाकवार
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार यांच्या माननीय कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्षा तथा लोकसभा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील आलापल्ली येथील क्रीड़ा संकुल ग्राऊंड (स्टेडियम) आयोजित भव्य सभेला संबोधित केले. या सभेला मोठ्या संख्येने सन्माननीय जनसमुदाय उपस्थित होता. सभेत जमलेल्या जनसमुदायाने हे दाखवून दिले आहे की अहेरी विधानसभा क्षेत्राचा संपूर्ण पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार यांच्यासोबत आहे. माझ्या समर्थनार्थ मतदारांना आवाहन केल्याबद्दल माननीय कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्षा तथा लोकसभा खासदार सुप्रियाताई सुळे यांचे खूप-खूप आभार भाग्यश्री ताई आत्राम यांनी मानले.या प्रसंगी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार प्रदेश सचिव श्री सुरेश पोरेड्डीवार, नागपूर विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार शाहीन भाभी हकीम, प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार श्री ओमप्रकाश शर्मा, गडचिरोली जिल्हा निरीक्षक श्री सुरेश गुडगे पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष अहेरी डॉ. निसार हकीम, अहेरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार अध्यक्ष रमेश चूक्कावार, जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली श्री रूपी दादा पोरटे, सिरोंचा तालुका अध्यक्ष काँग्रेस पक्ष श्री सतीश जवाजी , राज्य उपाध्यक्ष सी आय टी यू संघटना श्री रमेशचंद्र दहिवडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.