प्रफुल पटेल यांनी घेतली महायुती उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचार सभेची धुरा

0
93

धान उत्पादक शेतकऱ्यांना सिंचनाची हमी देत प्रकल्प आणि विकास कामांवर भर; कमळ चिन्हाला मतदानासाठी खासदारांचे आवाहन

गोंदिया : साकोली विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचारार्थ आज ग्राम सानगडी, तालुका साकोली येथे प्रचार सभा संपन्न झाली. या सभेत खासदार प्रफुल पटेल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत २० तारखेला कमळ चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

साकोली विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाणीटंचाई, सिंचन, रोजगाराच्या प्रश्नांवर विशेष लक्ष देण्याच्या उद्देशाने महायुती उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या नेतृत्वात विविध प्रकल्प राबवण्याची तयारी आहे. या भागातील शेतकरी धान उत्पादनात अग्रेसर असून, त्यांना सिंचनाची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्ह्यातील गोसे/खुर्द, इटियाडोह आणि चुलबंध अशा विविध प्रकल्पांद्वारे सिंचन सुविधा पुरवली जात आहे. भविष्यातील धापेवाडा टप्पा ३ प्रकल्पाद्वारे लाखनी व साकोलीपर्यंत पाणी आणून शिवणी, नवेगावबांध व इतर परिसरातील जलाशयांमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन ब्राह्मणकरांनी केले आहे.

महायुतीच्या संयुक्त प्रचार सभेला संबोधित करताना खा. श्री प्रफुल पटेल यांनी कार्यक्षम नेतृत्व आणि विकासकामांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी मतदारांना आवाहन केले की, २० तारखेला कमळ चिन्हाला मतदान करून मोठ्या मताधिक्याने  अविनाश ब्राह्मणकर यांना निवडून द्यावे. त्याचबरोबर पटेल यांनी मतदारांसाठी रोजगार आणि सिंचनाच्या आश्वासनांची पूर्तता करण्याची ग्वाही दिली.

खा. प्रफुल पटेल यांच्या सोबत संयुक्त सभेला महायुतीचे विविध मान्यवर उपस्थित होते, त्यात सर्वश्री गौरीशंकर बिसेन, सुनील मेंढे, सुनील फुंडे, सत्यनारायण अग्रवाल, सरिता मदनकर, हेमकृष्ण वाडीभस्मे, प्रभाकर सपाटे, विनायक बुराडे, अमोक हलमारे, अरविंद लोथे, नेवारे गुरुजी, शालिक हार्डीकर, चतुर्भुज भानारकर, राजूभाऊ हेडाऊ, राजूभाऊ वंजारी, विनोद रुखमोडे, मनोहर नगरकर आणि नंदूभाऊ हर्षे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला होता.

या सभेत प्रफुल पटेल यांनी खासदार म्हणून साकोली विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा आढावा घेतला. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि अविनाश ब्राह्मणकर यांना निवडून देण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला.