

ग्राम बाम्हणी येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत महिलांचा सहभाग, शेतकऱ्यांचे उत्थान आणि युवकांना रोजगारासाठी मतदानाचे आवाहन
गोंदिया : विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ ग्राम बाम्हनी, तालुका गोरेगाव येथे सौ. वर्षाताई प्रफुल पटेल यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, शेतकऱ्यांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासावर भर देण्याचे वचन देत महायुतीच्या उमेदवारांना येत्या २० तारखेला मतदान करण्याचे आवाहन केले.
सौ. वर्षाताई प्रफुल पटेल यांनी ग्राम बाम्हनी येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. या वेळी त्यांनी प्रगती, उन्नती, महिला आत्मनिर्भरता, युवकांना रोजगार उपलब्धता, तसेच शेतकरी व शेतमजुरांच्या उत्थानाचे मुद्दे मांडले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्व स्तरांवर विकासकार्ये तातडीने राबवली जातील आणि या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा, युवकांना रोजगाराच्या संधी, महिलांना आत्मनिर्भरतेसाठी विविध योजना आणण्यात येतील.
सौ. वर्षाताई प्रफुल पटेल यांनी मतदारांना आवाहन केले की, महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना पाठिंबा देऊन त्यांना विजय मिळवून द्यावा. महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी विशेष कार्यक्रम, शेतकरी-शेतमजूर कल्याण योजनेची अंमलबजावणी, तरुणांसाठी रोजगार निर्मिती आणि शिक्षणातील सुधारणा या बाबींसाठी त्यांनी महायुती सरकारवर विश्वास दाखवण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर आणि पदाधिकारी – सौ. वर्षाताई प्रफुल पटेल, केवल बघेले, कल्पना बहेकार, मायाताई चौधरी, गीता बिसेन, प्राची ठाकूर, बेबी परिहार, कल्पना शेवटे, श्रद्धा रहांगडाले, ललिता पुंडे, शशी ताराम, वंदना पटले, भारती बिसेन, सुशीला कटरे, वर्षा वैद्य, खिलेश्वरी परिहार, कल्पना गजभिये, हौशीला मडावी, रितू बिसेन, गीता भलावी, मेसंधी मेश्राम, सीमा बिसेन, संगीता बिसेन, बाबा बोपचे, बाबा बहेकार, लालचंद चव्हाण, पराग चौधरी, सुरेंद्र रहांगडाले, रमेश बिसेन, नीलकंठ गौतम, उमेश बिसेन, तिलक कटरे, उमेन्द्र बिसेन, प्रल्हाद बिसेन, राजेन्द्र बिसेन, सुखदेव कटरे, पराग चौधरी, यशपाल पटले, भारत भलावी, ओमकार भलावी, गोपाल भगत, देतराम पटले, अनिल गौतम यासह महायुतीचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित प्रत्येक मान्यवराने राजकुमार बडोले यांच्या प्रचाराची गरज अधोरेखित करताना मतदारांना महायुतीचे उमेदवार निवडून देण्याची विनंती केली.






