महायुती प्रचारार्थ मित्रपक्ष संयुक्त सभा : प्रफुल पटेल यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन

0
145

खासदार प्रफुल पटेल यांचे उपस्थितीत ग्राम बोदरा येथे महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा प्रचार

साकोली : ग्राम बोदरा (ता. साकोली) येथे आज हनुमान मंदिर समोरील पटांगणावर महायुतीचे उमेदवार  अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचारासाठी खासदार  प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत मित्रपक्ष संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पटेल यांनी महायुतीच्या उमेदवारास प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्याचे आवाहन केले.

खासदार  प्रफुल पटेल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास जलद गतीने होत आहे. कृषी, आरोग्य, गॅस, मोफत राशन, जनधन योजना, उज्वला योजना यासारख्या विविध योजनांद्वारे सामान्य माणसापर्यंत मदत पोहोचत आहे. याचप्रमाणे, राज्यात लाडली बहिण योजना, किसान सन्मान योजना, शेतकरी विज बिल माफी, मुलींच्या निःशुल्क उच्च शिक्षणाची योजना यांसारख्या अनेक जनहितार्थ योजना राबविल्या जात आहेत.

 पटेल यांनी पुढे सांगितले की, या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारास निवडून देणे आवश्यक आहे. महायुतीच्या विजयाने क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार असून, येणाऱ्या काळात सर्वांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करणे हा आमचा उद्देश आहे.

सभेला  प्रफुल पटेल यांच्यासह महायुतीचे विविध पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सर्वश्री सुनील फुंडे, शिवराम गिऱ्हेपुंजे, हेमकृष्ण वाडीभस्मे, अंताराम खोटेले, अंगराज समरीत, ललिताताई कापगते, देवेंद्र लांजेवार, वनिताताई डोये, जूमालाताई उईके, जयाताई भुरे, शीलाताई वासनिक, धनवंताताई राऊत, सुरेश कापगते यांचा समावेश होता.

महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या सभेचे आयोजन केले होते. कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सभेचे आयोजन करत गावकऱ्यांना एकत्र येण्यास आवाहन केले.