महिला सक्षमीकरण, बेरोजगारांसाठी रोजगार आणि शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी योजनेचा आढावा
अर्जुनी मोरगाव (विशेष प्रतिनिधी) – “महायुती सरकारने महिला सक्षमीकरण, बेरोजगार युवकांना रोजगार, शेतकऱ्यांना सन्मान निधी, अशा अनेक योजनांचा लाभ जनतेला दिला आहे. यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन महायुतीच्या नेत्या सौ. वर्षाताई पटेल यांनी केले. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या विजयासाठी आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना सौ. वर्षाताई पटेल यांनी सांगितले की, “खासदार प्रफुल पटेल हे या क्षेत्राच्या विकासासाठी सतत कार्यरत आहेत. राजकुमार बडोले यांनी देखील विविध सामाजिक आणि विकासकामांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. या दोघांची जोडी एकत्र आल्यास निश्चितच या क्षेत्राचा सर्वांगीण विकास होईल.”
राजकुमार बडोले यांच्या प्रचारासाठी सभा
राजकुमार बडोले यांचे अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील उमेदवारीसाठी आयोजित या सभेत, महायुतीच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यावेळी सौ. वर्षाताई पटेल यांनी महायुतीचे सरकार विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून राजकुमार बडोले यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

