तुमसर : सर्वांगीन प्रगतीचे व उन्नतीचे ध्येय ठेवून महायुती सरकारने अनेक कल्याणकारी योजना अमलात आणल्या आहेत. स्थिर व विकासाचे दृष्टिकोन असलेल्या सरकारने महिलांच्या सबलीकरणासाठी 1500 प्रति महिना सन्मानार्थ देत असून पुन्हा सत्ता आल्यास 2100 देण्याचा वादा केला आहे. प्रवासात 50 टक्के सवलत, मुलींना निःशुल्क उच्च शिक्षण, इ पिंक रिक्षा च्या माध्यमातून रोजगार म्हणजेच खऱ्या अर्थाने महिलांचे प्रश्न व सन्मान करण्याचें काम हे सरकार करीत आहे. शेतकरी, शेतमजुर यांच्या साठी सदैव धावून येणारे खा. प्रफुल पटेलजी यांच्या माध्यमातून या भागाचा विकास होत आहे. बावनथडी सिंचन प्रकल्प व लघु सिंचन प्रकल्प व बोनस च्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करने, यासारखे अनेक कामे झाली आहेत म्हणुन विकासाची कास असलेला नेतृत्वाच्या हाती आपली सत्ता द्या.
तुमसर विधानसभा क्षेत्रातील माहितीचे अधिकृत उमेदवार राजुभाऊ कारेमोरे यांच्या चुनाव प्रचारार्थ तुमसर शहरातील श्रीमती कुंदाताई वैद्य यांचे निवास स्थान, श्रीरामनगर व विक्की भोंडेकर, माता वॉर्ड येथे सौ वर्षाताई प्रफुल पटेल यांनी महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना येणाऱ्या 20 तारखेला घड्याळाचे बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन त्यांनीं केले.
बैठकीला सौ.वर्षाताई प्रफुल पटेल,सौ. वर्षाताई पटेल, सौ कल्याणीताई भुरे, सौ गीताताई कोंडेवार, सौ कुंदाताई वैद्य,. सौ शोभाताई लांजेवार, सौ सरोज ताई भुरे, सौ प्रीती मलेवार, सौ शैलाताई डोये, सौ पमाताई ठाकूर, सौ विजयाताई चोपकर, सौ शाहीन तुरक, सौ रोशनी भोंडेकर, सौ अर्चना भुरे, सौ कविता साखरवाडे, सौ अतिथी काळबांधे, सौ जयश्री गभणे, सौ नेहा मोटघरे, सौ नंदा डोरले, सौ सरिता सिंघनजुडे, सौ मीना गाढवे, विक्की भोंडेकर, जाकीर तूरक सहित मोठया संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

