संविधान कोणीही बदलू शकत नाही – खा. प्रफुल पटेल

0
124

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना साजेसे संविधान टिकवण्यासाठी जनतेचा निर्णायक पाठिंबा आवश्यक

गोंदिया, भीमनगर मैदान (17 नोव्हेंबर):
“परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचा कोणताही मूलभूत ढाचा कोणीही बदलू शकत नाही,” असे प्रतिपादन खा. प्रफुल पटेल यांनी महायुतीच्या उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या प्रचार सभेत केले. विरोधकांच्या नकारात्मक प्रचाराला बळी न पडता, येणाऱ्या २० तारखेला कमळ चिन्हावर मतदान करून विकासाला साथ द्या, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

खा. प्रफुल पटेल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आदर व्यक्त करताना संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि हक्क प्रदान केले आहेत, असे नमूद केले. “विरोधक संविधान बदलणार असल्याचा प्रचार करून जनतेत भ्रम निर्माण करत आहेत, परंतु सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की संविधानाचा मूलभूत ढाचा बदलणे अशक्य आहे,” असे ते म्हणाले.

पटेल यांनी महायुती सरकारच्या गेल्या ५ वर्षांच्या विकासकामांचा उल्लेख करून मतदारांना पुढील प्रगतीसाठी पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. “महायुती सरकारने जनहितार्थ अनेक उपक्रम राबवले आहेत. पुढील ५ वर्षांत विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचा पाठिंबा महत्त्वाचा आहे,” असे त्यांनी सांगितले.

या प्रचार सभेला खा. प्रफुल पटेल यांच्या सोबत महायुतीचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख नेत्यांमध्ये राजेंद्र जैन, विनोद अग्रवाल, नानू मुदलियार, मनोहर वालदे, विनीत सहारे, माधुरी नासरे, अमीत भालेराव, नागो बनसोड, घनश्याम पानतावणे, विजय रगडे, श्याम चौरे, वसंत गणविर, सुधीर कायरकर, प्रशांत सोनपूरे, श्रेयस खोब्रागडे, सोनल मेश्राम, हर्षवर्धन मेश्राम, मंगेश रंगारी, अविनाश महावत, मीनाक्षी गजभिये, अमन घोडेस्वार, राज माने, तुषार श्रीवास आदींचा समावेश होता.

सभा मोठ्या उत्साहात पार पडली असून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.

 

Previous articleमहिलांचे सक्षमीकरण व सन्मान करण्याचें काम हे सरकार करीत आहे – सौ. वर्षा प्रफुल पटेल
Next articleमतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी…