पालडोंगरी येथे मतदान जनजागृती उत्साहात संपन्न

0
817

मुख्यमंत्री योजनादूत रेखलाल रहांगडाले यांच्या पुढाकाराने मतदारांना मतदानाचे आवाहन

पालडोंगरी, तिरोडा : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पंचायत समिती अंतर्गत सेजगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील पालडोंगरी येथे आज, 17 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री योजनादूत रेखलाल सोमा रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली मतदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देत लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे रेखलाल रहांगडाले यांनी भीमा भाऊ टेंभरे यांच्या शेतात चालू असलेल्या ट्रॅक्टर आणि मळणी यंत्राच्या माध्यमातून शेतमजुरांशी संवाद साधला. त्यांनी चिठ्ठीवाटप करून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनीही मतदान हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्याचे मान्य केले आणि मतदानाच्या दिवशी काम थांबवून मतदान करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत टानिकलाल रहांगडाले, मुकेश रहांगडाले, रुपेश रहांगडाले, भीमा भाऊ टेंभरे, तुषार रहांगडाले, उमेश कावडे, हंसराज रहांगडाले, दादाराम रहांगडाले, विशाल पटले, टोलसिंग रहांगडाले तसेच इतर अनेक शेतकरी बांधव होते.

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामस्तरावर मतदानाची टक्केवारी वाढवणे आणि शेतकरी, शेतमजूर वर्गाला त्यांच्या मताधिकाराबद्दल जागरूक करणे हा होता. रेखलाल रहांगडाले यांनी सांगितले की, “लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे अनिवार्य आहे.”

पालडोंगरी येथील नागरिकांनी एकत्र येत आपल्या अधिकारांची जाणीव ठेवून मतदानाचा संकल्प केला. हा उपक्रम लोकशाहीचे महत्त्व पटवून देण्यासाठी व ग्रामीण भागात जनजागृतीसाठी एक आदर्श ठरला आहे.