गोंदिया : जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये आज १७ /११/२०२४ रोजी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष केतन शिवशंकर तुरकर यांनी पक्षाच्या विचारसरणीविरोधी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यावर कठोर कारवाई केली आहे. कमलेश बारेवार, हे मागील काही दिवसांपासून पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्याने, त्यांना पक्षातून तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीत पक्षाच्या विचारसरणीशी तडजोड केली जाणार नाही आणि अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात स्थान मिळणार नाही. बारेवार यांच्या निलंबनामुळे पक्षातील शिस्तीचा दाखला देण्यात आला आहे.

